Ad will apear here
Next
इदं न मम!
सर, खरंतर आम्ही मातीचे गोळे, पण ओल्या मातीला छान आकार देऊन तुम्ही आमचे जीवन शिल्प घडवलेत आणि हे सारे एकही पैसा न घेता आमच्यावरील प्रेमाने आईच्या वात्सल्याने केलेत.... पत्रातील हा मजकूर वाचून माझे डोळे झरू लागले...
........
सर, मी तुमचा विद्यार्थी इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतचा सारा माझा शैक्षणिक प्रवास जिल्हा परिषद शाळेतच झाला. माझ्या शाळेच्या शेजारीच तुम्ही रहायचात. तुम्ही खरंतर आमचे शिक्षक नव्हतात;मात्र आमच्या बालमनावर छान छान गोष्टींतून उत्तम संस्कार केलेत. अक्षर सुंदर कसं लिहायचं, पाढे पाठ कसे करायचे, शाळेतली शिस्त कशी पाळायची याचे धडे सर तुम्ही दिले. खरंतर आम्ही मातीचे गोळे, पण ओल्या मातीला छान आकार देऊन तुम्ही आमचे जीवन शिल्प घडवलेत आणि हे सारे एकही पैसा न घेता आमच्यावरील प्रेमाने आईच्या वात्सल्याने केलेत. 

एकदा तुम्ही मोठेपणी तुम्ही कोण होणार, असा प्रश्न विचारला होतात. माझ्या मनातला विचार मी बोलून दाखवला होता. मी भारताच्या सीमेवरती सैनिक म्हणून जाणार लष्करात अधिकारी होणार, तेव्हा सारी पोरे मला हसली होती. हडकुळा, अशक्त, दरिद्री मी पुढे शिकणार कसा अन् लष्करात मला घेणार कोण? हा विनोद वाटला सगळ्यांना म्हणूनच ते सारे हसले असतील. माझ्या पाठीवर शाबासकीची थाप मात्र तुम्ही दिलीत. ती प्रेरणा मला ऊर्जा ठरली. सर, खरंच मी लष्करात मोठा अधिकारी झालोय. केवळ तुमच्यामुळे. सोबत गुरुदक्षिणा छोटीशीच म्हणून काश्मिरी शाल, स्वेटर, मफलर, कानटोपी पाठवित आहे. तिचा स्वीकार करावा, ही नम्र प्रार्थना. 

ते पत्र वाचून माझे डोळे झरु लागले. आठवला तो दहा वर्षांपूवीचा शाळेच्या वर्गातला प्रसंग, मोठेपणी तुम्ही कोण होणार? या प्रश्नाचे उत्तर खरंच या विद्यार्थ्याने प्रत्यक्ष कृतीत उतरवले होते. एका समारंभात पालक म्हणून त्याने मला दिल्लीला बोलवले होते. इच्छा असूनही मी तब्येतीमुळे कार्यक्रमाला, सत्काराला जाऊ शकलो नव्हतो. तू कोण होणार, या प्रश्नाचे उत्तराचा मी लष्करात अधिकारी होणार या उत्तराचा दरवळ आज आठवला. पटले, आपण आपली निवृत्ती अशीच काही कामे करुन उत्तम आनंदाने, समाधानाने व्यतित करु शकतो. समाजरुपी ईश्वराप्रत पोहोचण्याची तीव्र इच्छाशक्ती हवी. आपण या मातीच्या गोळ्यांना सुंदर आकार देऊन उद्याच्या भारताचे आदर्श नागरिक खचित बनवू शकतो. नव्हे, ज्येष्ठांचे या समाजाप्रत हे कर्तव्यच आहे. असे अनेक विद्यार्थी कृतज्ञतेने मला भेटावयाला येतात. ते ज्या वस्तू, पैसे देतात ते इदं न मम! म्हणून मी गरिबांच्या शाळांना देत रहातो.

- महादेव साने 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/MZSTCH
Similar Posts
बोलक्या भिंती.... आजकाल शाळांच्या भिंतीही बोलक्या झाल्या आहेत. जुन्या काळातही भिंती बोलक्या होत्या, पण त्या शाळेच्या बाहेर. आतातर मोबाइलच्या भिंतींनी या सार्वजनिक बोलक्या भिंतीची जागा घेतली आहे. काळाचा महिमा...!
कोकावाला… दिसायला काळासावळा, ठिगळाची विजार, दंडकी पैरणं, डोक्याला पटकूर आणि हातात कोका घेऊन येणारा तो कोकावाला मला नेहमीच आठवायचा. त्याचा मुलगा शामा याला मी आश्रमशाळेत घातलं. पुढं त्याचं काय झालं...हे कळलंच नव्हतं...आज अचानक...
गुंतवणुकीचे संस्कार मुलं नोकरी-व्यवसाय करून स्वतःचे अर्थार्जन करू लागतात त्या वेळी सुरुवातीची चार-पाच वर्षं कमावलेला पैसा चैनीवर उधळतात; मात्र ही चैन पुढे महागात पडते. म्हणूनच बचतीचे संस्कार बालवयापासून करणं, घरातली बचत आणि खर्च या व्यवहारांची त्यांच्याशी चर्चा करणं आणि त्यांना गुंतवणुकीच्या पर्यायाची माहिती देणं या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत
बॉब विलीस आपल्या वेगवान गोलंदाजीने एक काळ गाजवलेले इंग्लंडचे क्रिकेटपटू रॉबर्ट जॉर्ज डिलन उर्फ बॉब विलीस यांचे चार डिसेंबर २०१९ रोजी निधन झाले. त्या निमित्ताने, त्यांचा हा अल्प परिचय...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language